1.भारतातील सायबर सुरक्षा भक्कम करण्यासाठी केंद्राने पावले उचलली आहेत.
2.केंद्र सरकार देशातील सायबर सुरक्षेसाठी (Indian Emergency Response Team)सरकारची सायबर सुरक्षा सांभाळणारी यंत्रणा ची स्थापना करणार आहे.
3.यापुढे सर्व संघटनांना पायाभूत माहिती तंत्रज्ञान सुविधांची जुळवणी करावी लागेल,तसेच सायबर सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करावी लागेल.
4.महाराष्ट्र ,तेलंगाना,तामिळनाडू,केरळ आणि झारखंड ही राज्ये स्वतःची यंत्रणा स्थापन करणार आहे.
5.सध्या बँकिंग क्षेत्रासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणेसारख्या तीन नव्या यंत्रणा (ऊर्जा निर्मिती ,पारेषण,वितरण) स्थापन केल्या जाणार आहेत.
6.नॅशनल सायबर कॉर्डीनेशन सेंटर(NCCC)स्थापन केले जाणार आहे.985 करोडरुपयांचा हा प्रकल्प पुढील पाच वर्षात पूर्ण केला जाणार आहे.
7.NCCC चा पहिला टप्पा 1 मार्च 2017 पासून कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.केंद्र सरकार लवकरच बॉटनेट सेंटर चालू करणार आहे.
CERT - IN (Indian Computer Emergency Response Team) विषयी :
1.Cert - In ही सरकारमान्य एजन्सी असून तिची स्थापना 2004 मध्ये झाली.हिचा मूळ उद्देश माहिती तंत्रज्ञान सुरक्षा राखणे असा आहे.
2.ही एजन्सी भारत सरकारच्या 'माहिती तंत्रज्ञान',इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय अंतर्गत कार्य करते.
3.आयटी सुधारणा कायदा 2008 नुसार Cert In कायद्याच्या कार्यवाही साठी जबाबदार राहील.
4.भारतीय सायबर स्पेस आणि पायाभूत सॉफ्टवेअर संरचना विघातक कृत्ये आणि हॅकिंगपासून वाचविणे.
5.घटनेच्या वेळी प्रतिसाद देणे,विघातक कृत्यांचा रिपोर्ट आणि भरतीय सुरक्षित आयटी वातावरणाचा प्रसार करणे हे या संस्थेचे उदिष्ट आहे.
0 comments: